पुणे : कोविशिल्ड-कोव्हॅसिन घेत असलेल्यांसाठी एका नव्या बूस्टर डोसला मंजूरी मिळाली आहे. हा डोस इंजेक्शनऐवजी नाकातून दिला जाणार आहे. भारताचे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने शुक्रवारी आपत्कालिन वापरासाठी भारत बायोटेकच्या इंट्रानेझल लस ‘फाइव्ह आर्म्स’ ला मंजुरी दिली. हे बूस्टर डोस म्हणून दिले जाणार आहे.
या लसीला कोणत्याही इंजेक्शनची आवश्यकता नसल्यामुळे इजा होण्याचा धोका नाही. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणाची गरज भासणार नाही.लसीचे 4 थेंब पुरेसे आहेत.
भारत बायोटेकच्या इंट्रानेझल लसीचे नाव BBV154 आहे. प्राथमिक डोस म्हणून आपत्कालीन वापरासाठी 6 सप्टेंबर रोजी मान्यता देण्यात आली. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीचा डोस दिला जाऊ शकतो.
तो दुसरा डोस दिल्यानंतर 6 महिन्यांनी दिला जाईल. त्याची खास गोष्ट अशी आहे की, ते शरीरात प्रवेश करताच कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण दोन्ही रोखते.
Covaxin आणि Covishield सारख्या लसी घेणार्यांना इंट्रानेझल लस बूस्टर डोस म्हणून दिली जाऊ शकते. भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष डॉ. कृष्णा एला यांच्या मते, पोलिओप्रमाणेच या लसीचे 4 थेंबही पुरेसे आहेत. दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन थेंब टाकले जातात.