दूध हे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते. दुधाला पूर्ण अन्न देखील म्हटलं जातं. कारण, यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. पण, हे दूध घेताना तुम्हाला आणखी फायदा करून घ्यायचा असल्यास त्यात फक्त शुद्ध तूप अर्थात असली घी टाका. याने तुम्हाला खूपच फायदा होऊ शकतो.
दुधात तूप मिसळल्याने अनेक फायदे होतात. शरीराला ऊर्जा मिळू शकते. तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे आपल्याला सतत ऊर्जा देतात आणि त्यामुळे शरीराच्या कार्यात खूप मदत होते. यामुळेच हे उत्कृष्ट दुग्धजन्य पदार्थ दुधात मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो. पोषक तत्वांचे शोषण वाढेल. तूप घातल्याने दुधात असलेले फॅट विरघळणारे जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के) शोषण्यास मदत होते.
तसेच तुमच्या शरीराला जेवढी पोषक तत्वे मिळतील तेवढे ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. तूप आणि दुधाच्या मिश्रणामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा चांगला स्त्रोत मिळतो, ज्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी फायदा होतो. तूप सांध्यांसाठी नैसर्गिक स्नेहक म्हणूनही काम करते, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.