आपण निरोगी असावं अशी अनेकांची इच्छा असते. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. आरोग्याकडे विशेष लक्षही दिलं जातं. असे असताना फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका आता वाढताना दिसत आहे. पण काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
2006 ते 2010 दरम्यान जन्मलेल्या लोकांवर अभ्यास करण्यात आला. कारण, या वयोगटातील सर्व 13 ते 18 वर्षाच्या दरम्यान आहेत. त्यात सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातल्याने 70 वर्षांमध्ये जगभरातील 1.2 दशलक्ष फुफ्फुसाच्या कर्करोगाने होणारे मृत्यू टाळता येतील. 2021 मध्ये, भारतात तंबाखूमुळे सुमारे 10 लाख मृत्यू झाले, जे एकूण मृत्यूच्या सुमारे 17.8 टक्के होते. यापैकी 79.8 टक्के मृत्यू हे धूम्रपानामुळे झाले आहेत आणि 21.0 टक्के मृत्यू हे सेकंड हॅण्ड स्मोकमुळे झाले आहेत.
तसेच फुफ्फुसाचा कर्करोग जगभरातील अनेक लोकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. यापैकी दोन तृतीयांश मृत्यू तंबाखू आणि धूम्रपानामुळे होतात. तंबाखू बंद केल्यास हा मृत्यू टाळता येऊ शकतो. धूम्रपानामुळे आजारी पडलेल्या लोकांवर उपचार आणि काळजी घेण्याचा आरोग्य यंत्रणेवरील दबावही लक्षणीयरीत्या कमी करता येऊ शकतो.