प्रत्येक महिलेच्या जीवनात मासिक पाळी हा भाग जोडलेला असतो. या दिवसांत महिलांना काही त्रासाला सामोरेही जावे लागते. त्यामुळे यापासून आराम मिळवण्यासाठी या दिवसांत भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मासिक पाळीच्या त्रासापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गुळाच्या पाण्यात जिरे मिसळून पिणे गुणकारक मानले जाते.
जिरे व गूळ यामध्ये आढळणारे तत्त्व मासिक पाळीचा त्रास कमी करतात. यासाठी एक चमचा गूळ व एक चमचा जिरे घ्या. एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. यामध्ये एक चमचा गूळ व अर्धा चमचा जिरे मिसळा. या पाण्याला उकळून थंड करा. पाणी पूर्ण थंड न होऊ देता कोमट असताना प्या. मासिक पाळीदरम्यान त्रास होऊ नये यासाठी फास्ट फूड खाणे टाळणे गरजेचे आहे. दररोज ध्यान व योग केल्यास होणारा त्रास कमी करता येऊ शकतो.
नाष्टानंतर दररोज एकदा हे पाणी प्या. गुळातील अँटी इन्फ्लेमेटरी गुण पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासापासून रक्षण करतात. यामुळे पाळी नियमित होते. जिरे फायदेशीर मानले जाते. जिऱ्यात लोह व अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे मासिक पाळीत त्रास होत नसल्याचे सांगण्यात येते.