पुणे: आजकाल ‘ग्लोइंग स्किन’ म्हणजे चमकदार आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी अनेक महिला प्रयत्न करतात. खासकरून कोरियन (Korean Skincare) महिलांसारखी त्वचा (glass skin) असणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण यासाठी महागडी उत्पादने आणि उपचार आवश्यक आहेत असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र, कमी खर्चात आणि घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साध्या गोष्टींचा वापर करून तुम्हीही कोरियन ग्लोइंग स्किन मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया

1. डबल क्लींजिंग (Double Cleansing): कोरियन स्किनकेअरचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ‘डबल क्लींजिंग’. यात आधी क्लीन्झर वापरतात आणि नंतर फोम किंवा पाण्यावर आधारित फेसवॉशने चेहरा स्वच्छ करतात. यासाठी तुम्ही महागड्या उत्पादनांऐवजी खोबरेल तेल किंवा बदाम तेलाचा वापर करू शकता.

2. हायड्रेशन आणि लेअरिंग: चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेला पुरेसे मॉइश्चर देणे खूप गरजेचे आहे. यासाठी बाजारातील टोनरऐवजी तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता. स्वच्छ चेहऱ्यावर गुलाब पाणी लावून ते त्वचेत मुरू द्या. ही प्रक्रिया 3-4 वेळा पुन्हा करा. यामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळते आणि ती आतून हायड्रेटेड राहते.

3. घरगुती फेस पॅकचा वापर: महागड्या फेस पॅकऐवजी स्वयंपाकघरातील साधे पदार्थ वापरून तुम्ही उत्तम रिझल्ट मिळवू शकता. यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करा. तांदूळ 10-15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर ते पाणी गाळून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा चमकदार होते. याशिवाय, मध आणि हळद एकत्र करून लावल्यास त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते.
4. चेहऱ्याचा मसाज आणि सनस्क्रीन: दररोज 5 मिनिटे चेहऱ्याचा हलका मसाज केल्यास चेहऱ्यातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोरियन ‘ग्लास स्किन’साठी उन्हापासून संरक्षण करणे खूप आवश्यक आहे. म्हणून घरातून बाहेर पडण्यापूर्वी चांगल्या प्रतीचा सनस्क्रीन (Sunscreen) नक्की वापरा. या सोप्या टिप्स नियमितपणे फॉलो केल्यास कमी खर्चातही तुम्हाला कोरियन महिलांसारखी चमकदार आणि निरोगी त्वचा मिळू शकते.
( Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आणि माहितीच्या उद्देशाने आहे. येथे नमूद केलेल्या टिप्स आणि घरगुती उपाय सामान्य पद्धती आणि सूचनांवर आधारित आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. या लेखात दिलेल्या माहितीच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रतिकूल परिणामांसाठी किंवा प्रतिक्रियांबद्दल लेखक आणि प्रकाशक जबाबदार नाहीत.)







