पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे शरीर थंड कसं राहील याकडे लक्ष दिलं जातं. ताक, दही, सरबत यांसारख्या पेयांना पसंती दिली जाते. त्यात दही केवळ चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि चांगले बॅक्टेरिया असतात जे पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडे मजबूत करतात.
दही शरीराला थंड ठेवते, पचनास मदत करते. इतकेच नाहीतर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, हायड्रेशनमध्ये मदत करते. वजन कमी करण्यासह हाडे मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय, दही खाण्याचे फायदे तेव्हाच मिळू शकतात जेव्हा तुम्ही ते योग्य पद्धतीने खाल. जर दही योग्य पद्धतीने खाल्ले नाही तर तेही नुकसानकारक होऊ शकते. रात्री किंवा हिवाळ्यात थंड दही खाणे टाळावे. रात्री दही खाल्ल्याने सर्दी किंवा जडपणा येऊ शकतो. हिवाळ्यात थंड दही खाणे टाळा.
दिवसभरात विशेषतः दुपारच्या जेवणात दही खाणे चांगले. रात्री खाल्ल्याने कफ वाढून सर्दी-खोकला होऊ शकतो. रात्री खायचे असल्यास त्यात थोडी काळी मिरी किंवा हळद घाला. आंबट दही खाऊ नका. खूप आंबट किंवा अनेक दिवस जुने दही गॅस, ऍसिडिटी किंवा जुलाब होऊ शकते. दह्यात थोडी साखर किंवा मीठ आणि जिरे घालू शकता. पण जास्त साखर घालू नका. उन्हाळा आणि पावसाळ्यात दही आरोग्यासाठी चांगले असते. पण हिवाळ्यात ते कमी प्रमाणात आणि गरम अन्नासोबतच खावे.