पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या निसर्गात अनेक वनस्पती, झाडे आहेत. त्याचा फायदा आणि उपयोगही विविध प्रकारे करता येऊ शकतो. त्यात कडुलिंबाचे पाने खूपच प्रभावी ठरतात. या पानांचा वापर केल्यास मुरुम, डागांवर अत्यंत प्रभावीपणे काम केले जाते. याच कडुलिंबाच्या पानांचे दररोज सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन अनेक आजारांना प्रतिबंध करता येते.
कडुलिंबाची पाने विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला आणि घसादुखी बरा करण्यासाठी फंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांनी युक्त कडुलिंबाचे सेवन केल्यास तात्काळ आराम मिळतो. दररोज 10-12 कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास अनेक आजारांवर गुणकारी ठरते. कडुनिंबाच्या पानांचे दाहकविरोधी गुणधर्म मुक्त रॅडिकल्समुळे निर्माण होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढतात. ऑक्सिडेटिव्ह ताण यकृताच्या ऊतींचे नुकसान करते. यकृत निरोगी ठेवण्यासाठी कडुलिंबाची पाने गुणकारी आहेत.
चवीला कडू असणारी कडुलिंबाची पानं आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फायदेशीर ठरतात. शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप प्रभावी ठरतात. औषधी गुणांनी भरलेली कडुलिंबाची पाने अनेक आजार दूर करतात. कडुलिंबाच्या पानांचे रोज सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन अनेक आजारांना प्रतिबंध करता येते.