आपल्या घरातील मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात, असे अनेकांना माहिती नसेल. पण, हे खरं आहे. या मसाल्यांचा आहारात समावेश केल्याने शरीराची कार्यप्रणाली सुधारते आणि अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो. बहुतेक मसाले पोटासाठी चांगले असतात आणि गॅस, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पोटदुखीपासून आराम देतात. यामध्ये जिऱ्याचे नाव देखील येते.
अॅसिडिटी दूर राहण्यासाठी जिरे उपयोगी ठरते. जिरे, धने, बडीशेप आणि शुगर कँडी समान प्रमाणात बारीक करून घेतल्यास फायद्याचे ठरू शकते. जेवणानंतर दिवसातून दोन किंवा तीन वेळा साध्या पाण्यासोबत एक चमचे सतत वापरा. तीव्र ॲसिडिटीच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू लागेल. एक चमचा जिरे आणि एक चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी एक ग्लास दुधासोबत घ्या. याने महिलांना नवी ऊर्जा मिळू शकते. इतकेच नाहीतर प्रसूतीनंतर पाठदुखी आणि सांधेदुखीपासून मुक्त होण्यास मदत करते. असे जरी असले तरी याचा वापर करताना डॉक्टरांचा सल्लाही घेणे महत्त्वाचे ठरू शकते.
याशिवाय, जिऱ्याचा आहारात समावेश केल्याने पचनक्रिया सुधारते. लोहाची कमतरता भरून निघते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रण ठेवण्यासही मदत होते. वजन नियंत्रणात उपयुक्तही ठरू शकते.