पुणे प्राईम न्यूज डेस्क: वाढतं वजन चिंतेचं कारण ठरू शकतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काहीना काहीतरी प्रयत्न केले जातात. वजन जर सारखं वाढत असेल तर आजारांना आयतं निमंत्रणच मिळू शकतं. त्यामुळे याकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे बनले आहे. पण असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
तुमचे वजन वाढत असेल तर लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी अतिशय स्वस्त आणि महत्त्वाचा पर्याय मानला जातो. यासाठी सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात एक लिंबू पिळून त्यात काळे मीठ मिसळून प्यावे. असे नियमित केल्याने वजन बर्याच प्रमाणात कमी होऊ शकते. याशिवाय, ओवा हा एक मसाल्यातील महत्वाचा घटक आहे. ओवा खाल्ल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
बडीशेपचे पाणी वजन कमी करण्यासाठी गुणकारी मानले जाते. बडीशेप अनेकदा जेवणानंतर खाल्ली जाते, कारण ती नैसर्गिक माऊथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. एक ग्लासभर पाण्यात एक चमचा बडीशेप मिसळा आणि रात्रभर भिजवा. सकाळी सुती कपड्याने गाळून ते पाणी प्यावे, असे केल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.