पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे बनले आहे. पण काहीना काहीतरी कारणांमुळे हेदेखील अनेकांना शक्य होत नाही. परिणामी, आजारांना निमंत्रणच मिळत असते. त्यात मधुमेह अर्थात डायबिटिस हा आजारही बळावू शकतो.
मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण थोडाही निष्काळजीपणा आपल्या रक्तातील साखर वाढवू शकते. मधुमेहावर पेरूची पाने गुणकारी मानली जातात. या पानांमध्ये औषधी गुणधर्म भरभरून असतात. त्यामुळे याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. यासोबतच तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळीही नियंत्रणात राहते. यासाठी पेरूच्या पानांचा चहा बनवून पिऊ देखील शकता. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास आणि दृष्टी वाढण्यास मदत होते.
कोरफड हे वजन नियंत्रणासाठी देखील फायदेशीर मानले जाते. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. तुमची साखरेची पातळी मर्यादेपेक्षा जास्त असली तरी कोरफडीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा फायदेशीर मानला जातो. कांद्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.