डॉ. सुष्मा कुंजीर
पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत त्याचे फायदेही जास्त आहेत. आरोग्याकडे लक्ष देताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यातच खजूर हा पदार्थ गोड जरी असला तरी त्याचे अनेक फायदे आहेत. हे खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी सुधारते. तसेच प्रसूती वेदनाही कमी होतात.
खजूर खाल्ल्याने अशक्तपणा असलेल्या लोकांसाठी दुधासह खजूर सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही खजूर आणि दूध उकळून खाल्ल्यास याचा खूप लवकर फायदा होतो आणि रक्ताची कमतरता दूर होते. ज्या लोकांच्या रक्तात हिमोग्लोबिनची पातळी कमी असते, त्यांना खजूर खाल्ल्याने फायदा होतो. त्याच्या नियमित सेवनाने हिमोग्लोबिनची पातळी तर सुधारतेच आणि अशक्तपणाही दूर होतो.
जर तुम्हाला कमी झोपेची समस्या जाणवत असेल तर खजूर त्यावर गुणकारी ठरू शकतो. चांगल्या झोपेसाठी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूर शरीरात मेलाटोनिन नावाचे हार्मोन तयार करतात, ज्यामुळे चांगली झोप लागते. गरोदरपणात खजूर खाल्ले तर ते प्रसूतीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतात.
खजूराचे सेवन केल्याने स्त्रियांना प्रसूतीदरम्यान होणाऱ्या प्रसूती वेदना कमी होतात. गर्भधारणेच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये खजूरचे सेवन करणे सर्वात फायदेशीर आहे. पण हे सर्व करताना आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मगच खजूर खाण्याला सुरुवात करावी.
(लेखिका या विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर येथे प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत)