Health News: पुणे प्राईम न्यूज डेस्क: कामानिमित्त असो किंवा इतर कारणामुळे अनेकदा थकवा हा जाणवत असतोच. पण हाच थकवा सातत्याने जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याकडे लक्ष देऊन वेळीच उपचार घेणे गरजेचे असते. मात्र, मसाज हा त्यावर एक रामबाण उपाय मानला जातो. मसाज केल्याने त्याचा चांगलाच फायदा होऊ शकतो.
आपल्या शरीरातील थकवा दूर करण्यासाठी मसाज फायदेशीर ठरतो. पण जर मसाज करणं शक्य नसल्यास संपूर्ण शरीरावर सनस्क्रीन लोशन लावा आणि कोवळ्या उन्हात बसा. संपूर्ण शरीर शिथिल ठेवा आणि मेंदू शांत करण्यासाठी केवळ आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करावे, असे केल्याने आराम मिळू शकतो. इतकेच नाहीतर कोवळं उन्ह अंगावर घेतल्यानं शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होतेच. शिवाय, शरीराला कित्येक आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक लाभ देखील मिळतात.
संपूर्ण शरीराचा मसाज केल्यास ऊर्जा मिळते, मूड फ्रेश होतो. याव्यतिरिक्त शरीरातील रक्तप्रवाह देखील वाढतो. तणाव दूर करण्यासाठी डोक्याचा मसाज केल्यास तुमचा मेंदू शांत होण्यास मदत मिळते. यामुळे चांगली झोप देखील येते. योग्य पद्धतीने मसाज केल्यास शारीरिक थकवा आणि तणाव दूर होण्यास मदत मिळते.