पुणे प्राईम न्यूज डेस्क: बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे. आरोग्याची योग्यरित्या काळजी घेतल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. बऱ्याचदा आपल्या शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो.
रक्तातील लोहाचं प्रमाण योग्य असलं तरीही रक्त कमी असतं. अशावेळी रक्ताचे प्रमाण वाढवावं लागतं. असे काही पदार्थ आहेत त्याचा आहारात समावेश केल्यास फायद्याचे ठरू शकते. शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी रोजच्या आहारात अंडीचा समावेश करावा. रोज सकाळी नाश्त्यामध्ये दोन उकडलेल्या अंड्यांचा समावेश करावा. अंड्यामध्ये एंटीऑक्सिडेंट, प्रोटीन आणि आयर्नचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी अंड्याची मदत होते. बीटापासून कोशिंबीर, कच्च किंवा उकडलेलं बीट अथवा बीट ज्यूस काहीही तुम्ही घेऊ शकता. बीट खाल्ल्यामुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं यासोबत रक्त वाढण्यासाठी मदत होते.
तसेच डाळींब हे रोज खाल्ल तरीही शरीरासाठी उत्तम आहे. थंड गुणधर्म असणाऱ्या डाळींबामुळे शरीरातील रक्त वाढण्यासोबतच हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते. डाळींबामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असतं. डोकेदुखी, उदासिनता, आळस दूर करण्यासाठी डाळींबाचे रोज दाणे खावेत. त्यामुळे प्रकृती सुधारण्यास मदत होते. याशिवाय, आहारात रोज एकतरी पालेभाजीचा समावेश करायला हवा.