पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. कधी कडाक्याची थंडी तर कधी अचानक गरमी. यामध्ये आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान समोर येतं. हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाशामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे सर्दी, खोकला, संसर्ग यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.
हिवाळ्यात हे आजार टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, शरीर आतून उबदार ठेवणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही ड्रायफ्रुट्सचा समावेश करू शकता. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे तुमचा थंडीपासून संरक्षण तर होईलच, शिवाय दिवसभर शरीरही उत्साही राहील. मात्र, दररोज ड्रायफ्रूट्स खाण्यास मर्यादा आहेत. त्याचे जास्त प्रमाण देखील हानिकारक असू शकते.
तुम्ही जर केवळ 10 बदाम खाल्ले तर त्यातून तुम्हाला 2.5 ग्रॅम प्रोटीन मिळू शकते. बदामामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम, कॉपर, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. या 10 बदामामध्ये 2.5 ग्रॅम प्रथिने, 2.37 ग्रॅम कार्ब आणि 69 कॅलरीज असतात. साधारणपणे दिवसातून 2 ते 5 भिजवलेले बदाम खाल्ल्यास आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरू शकते.