Health Tips: पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपण निरोगी असावं असे सर्वांनाच वाटत असतं. पण असे काही आजार आहेत त्यावर योग्य उपचार केल्यास त्यापासून लगेच सुटका मिळू शकते. चक्कर येणे ही एक गंभीर समस्या आहे. त्यावर योग्यवेळी उपचार करणे गरजेचे आहे. चक्कर येण्याची कारणे अनेक असू शकतात. पण तरीही याकडे दुर्लक्ष न करता तातडीने लक्ष दिल्यास आराम मिळू शकतो.
चक्कर आल्यास आले फायद्याचे ठरू शकते. आल्याचा छोटासा तुकडा तोंडात ठेऊन चॉकलेटसारखा हळूहळू चघळल्यास त्याने चक्कर येण्यापासून आराम मिळू शकतो. तसेच जर तुम्हाला कच्च आलं खाण्यास काही त्रास होत असेल तर तुम्ही नियमित आल्याचा चहा पिऊ शकता. आलं आपल्या शरीरातील रक्तप्रवाह वाढवण्याचं काम करतं. सोबतच आलं तुमचा मेंदू शांत ठेऊन त्यास संतुलित ठेवण्यास लाभदायक ठरतं.
धणे आणि आवळा हे देखील चक्कर येण्यावर गुणकारी मानले जातात. बहुतांश वेळा कमजोरी कमी होताच चक्कर येण्याची समस्या देखील दूर होते. पण जर तुम्हाला चक्कर कोणत्या औषधांचा साईड इफेक्ट, मेंदूशी निगडीत काही समस्या किंवा अन्य कोणत्या रोगामुळे येत असेल तर याचे निदान हे केवळ वैद्यकीय उपचारांनीच होऊ शकते.
रात्री झोपताना एक चमचा धणे आणि सुका आवळा पाण्यामध्ये भिजत घाला. सकाळी हे पाणी गाळून त्याचं सेवन करा. शक्य असल्यास धणे आणि आवळा गुळासोबत चावून खा. यामुळे तुमचं पोट साफ राहील आणि शरीर नैसर्गिकरित्या मजबूत राहील. आवळा आणि धणे अनेक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करतात.