पुणे प्राईम न्यूज डेस्क: बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यात आपल्याला कोणतेही आजार होऊ नये, असे सर्वांनाच वाटत असते. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. मात्र, काही आजारांना आपल्याकडून न कळत का होईना एकप्रकारे आमंत्रणच मिळते. त्यापैकी एक म्हणजे हृदयासंबंधी विकार.
जर आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिलं नाहीतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यात हार्ट अटॅक ही समस्या अत्यंत गंभीर होत आहे. हृदय अर्थात हार्टला जर व्यवस्थित ब्लड सर्कुलेशन होत नसेल किंवा ब्लॉकेज असेल तर यामुळे हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते. हार्ट अटॅक येण्यापूर्वी त्याची काही लक्षणे असतात. त्यामध्ये छातीत दुखणे, गुदमरल्यासारखे वाटणे, अस्वस्थ वाटणे ही हृदयविकाराची काही लक्षणे असू शकतात.
हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत तीव्र वेदना होतात. जबडा, पाठ किंवा डाव्या हाताला मुंग्या येणे, घाम येतो. थकवा जाणवणे, धाप लागणे, अचानक हार्ट बीट्स वाढणे ही सुद्धा हार्ट अटॅकची लक्षणे आहेत. हार्टला शिरा ब्लॉक झाल्यामुळे छातीत जडपणा येऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो.