Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माढा येथे होणाऱ्या नेत्र शस्त्रक्रिया शिबिरासाठी सुनेत्रा अजित पवार यांना आमंत्रण…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 22 January 2023, 17:44

राजेंद्रकुमार गुंड

माढा : माढेश्वरी अर्बन बँक व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगाव (टें) यांच्या संयुक्त विद्यमाने माढा येथे 9 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क संस्थापक-अध्यक्षा सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती, माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन अशोक लुणावत यांनी दिली.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माढा येथे मागील 14 वर्षांपासून नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन केले जाते. तसेच बारामती येथेही एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने मागील 10 वर्षांपासून नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते.

ही बाब निश्चितच समाजोपयोगी आणि कौतुकास्पद असल्याचे सांगून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी दोन्ही ठिकाणी शिबिराच्या वेळी केले जात असलेले अचूक नियोजन व व्यवस्थेचे कौतुक केले.

यावेळी टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, आमचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यात आहे त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी असे विधायक व रचनात्मक उपक्रम सुरू आहेत त्याठिकाणी जाऊन त्यांचे कौतुक करुन त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हे पवार कुटुंबीयांचे कर्तव्य समजतो.

माढा येथे आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या नेत्र शिबिराच्या बाबतीत मी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांच्याकडून ऐकले आहे परंतु यावेळेस माढा येथे प्रत्यक्ष शिबिराच्या ठिकाणी जाण्याचा योग येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत यांनी बारामती येथे आयोजित नेत्र शिबिराच्या ठिकाणचे सुसज्ज व अद्ययावत ऑपरेशन थिएटर, रुग्णांचा वार्ड, निवासाची व भोजनाची व्यवस्था, एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सदस्यांच्या ड्रेस कोड व शिस्त याची पाहणी करून कौतुक केले. पवार कुटुंबीयांचे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक, शैक्षणिक, सहकार, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी आदी क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

यावेळी जागतिक कीर्तीचे नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, हितेश छाजेड, अमोल कुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22
Next Post

‘इंद्रायणी थडी’त साकारणार भाजपा पक्षनिष्ठचे प्रेरणास्थळ!भाजपाच्या दिवंगत आमदारांचा अर्धाकृती पुतळा उभारणार -आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून स्मृतींना उजाळा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.