आपण निरोगी राहावं असं अनेकांना वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. त्यात आपल्या जीवनशैलीत काही गोष्टींचा समावेश केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. यातून बॅड कोलेस्ट्रॉलसह हृदयाची समस्या देखील दूर होऊ शकते.
कोलेस्टोरॉलचे दोन प्रकार असते. त्यात गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल. रक्तातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्याने हृदयविकार, पक्षाघात आणि इतर गंभीर समस्यांचा धोका वाढतो. हाय कोलेस्टेरॉल हे प्रामुख्याने चरबीयुक्त पदार्थ खाणे, पुरेसा व्यायाम न करणे, वजन जास्त असणे, धूम्रपान आणि मद्यपान करणे यामुळे होते. ज्या लोकांच्या कुटुंबात आधीच हाय कोलेस्टेरॉलची समस्या आहे त्यांना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.
आहारातील काही बदल कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यासाठी तुमच्या आहारातून सॅच्युरेटेड फॅटचे पदार्थ कमी करणे सर्वात महत्त्वाचे आहे. फॅट प्रामुख्याने मांस आणि पूर्ण चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळतात. त्याने कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होऊ शकते. कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खा.
नियमित व्यायाम करा; शारीरिक हालचाल वाढवा
व्यायाम करणे आणि तुमची शारीरिक हालचाल वाढवणे हा देखील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो. व्यायामाच्या मदतीने कोलेस्टेरॉल सुधारले जाऊ शकते. मध्यम शारीरिक हालचाली उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) किंवा चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.