उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत सुशिक्षित नोकरदार सकाळी कामावर जाताना प्लास्टिकच्या पिशवीत कचरा भरून सर्रासपणे उघड्यावर व रस्त्याच्या कडेला कचरा फेकताना आढळून येत आहेत. यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र सध्या उरुळी कांचन (ता. हवेली) शहरात पहायला मिळत आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील सहाच्या सहा प्रभागात रोज घंटागाडी फिरत आहे, मात्र काही नागरिक वसाहतीतील वरच्या मजल्यावरून खाली येऊन कचरा टाकण्यापेक्षा एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून सकाळी कमावर जाताना ओढ्याच्या शेजारी, महामार्गाच्या कडेला, आडवळणावर, मोकळ्या जागी, उघड्यावर, सार्वजनिक ठिकाणच्या चौकाच्या ठिकाणी सर्रासपणे कचरा टाकला जातो. काही सुशिक्षित महिला तर स्वतःची गाडी घेऊन तसेच ऑफिसला जाता जाता हा कचरा गाडीवरुन कचरा कचराकुंडीच्या दिशेने फेकताना आढळून येत आहेत. मग हा कचरा कचराकुंडीत पडो अथवा कचराकुंडीच्या बाहेर त्यामुळे या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी.
उरुळी कांचन ग्रामपंचायतीने वसाहती आणि ठिकठीकाणी स्वतंत्र कचराकुंड्या ठेवल्या आहेत. मात्र वैयक्तिक कचराकुंड्या निरुपयोगी ठरत आहेत. काहीजण तर घंटागाडी येऊन गेल्यानंतर सर्रासपणे उघड्यावरती कचऱ्याची पिशवी फेकून जातात. त्यामुळे एकप्रकारे रोगराईला आमंत्रण मिळत आहे व त्याचे खापर मात्र शासकीय यंत्रणेवर फोडले जाते. प्रत्येक नागरिकाने घरातील कचरा घंटागाडी टाकण्याची सवय लावली पाहिजे. तरच शहरातील विद्रुपीकरण बंद होईल व आरोग्य चांगले लाभेल. त्यामुळे अशा कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर ग्रामपंचायतच्या वतीने कडक कारवाई करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक, दुकानदार, व्यवसायिक करू लागले आहेत.
मात्र शासकीय यंत्रणेवर फोडले जाते. प्रत्येक नागरिकाने घरातील कचरा घंटागाडी टाकण्याची सवय लावली पाहिजे. तरच शहरातील विद्रुपीकरण बंद होईल व आरोग्य चांगले लाभेल. त्यामुळे अशा कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर ग्रामपंचायतच्या वतीने कडक कारवाई करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक, दुकानदार, व्यवसायिक करू लागले आहेत.
दरम्यान, विशेष म्हणजे उघड्यावर कचरा फेकण्यात नोकरदार पुढे आहेत. रात्री जेवणानंतर शतपावली करण्यासाठी जातानाही कचरा टाकला जातो. पुणे – सोलापूर महामार्गाच्या शेजारी, नवीन बाजार भरण्याच्या ठिकाणी, जुनी भाजी मंडईच्या ओढ्याच्या ठिकाणी, तसेच सोसायटी शेजारील उघड्या जागेवर फेकलेल्या कचऱ्याचे ढीग वाढताना दिसून येत आहेत.
ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले कामगार पुढीलप्रमाणे : ६ घंटागाडी, १ ट्रक्टर, ३० कचरा कुंड्या, १ ट्रक्टर कचराडंपर, १५ कर्मचारी, १४ महिला साफसफाई कर्मचारी
याबाबत उरुळी कांचनचे ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस म्हणाले, “आपला गाव स्वच्छ ठेवण्यासाठी जर घंटा दारात येत असेल आपला कचरा गोळा करून त्या गाडीतच टाकावा. विनाकारण दुसऱ्या ठिकाणी न टाकता कचरा कुंडीतच टाकावा. तसेच चिकन, मटन, व्यावसायिक व भाजीवाल्यानी आपला कचरा ओढ्याच्या पात्रात न टाकता साठवून ठेऊन घंटागाडी आल्यावर त्यामध्ये टाकावा. यासाठी दुपारी एका घंटागाडीची सोय करण्यात आली आहे. तसेच सुज्ञ नागरिकांनी घंटा गाडी नाही आली तर ग्रामपंचायत कार्यालयात कार्यालयात तक्रार द्या. परंतु इतर जागी कचरा टाकू नये अन्यथा दंड आकरण्यात येईल.”