युनूस तांबोळी
शिरूर : शासन विविध स्तरातून सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबवत असते. तसेच आरोग्या संबंधी देखील अनेक योजनांचे नियोजन केले जाते. त्याचा अभ्यास शिक्षक व पालकांनी केला पाहिजे. त्यातून आपल्या पाल्याची आरोग्याची काळजी घेता आली पाहिजे. यासाठी शाळांमधून शालेय व्यवस्थापन समितीने पुढाकार घ्यावा, असे मत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी व्यक्त केले.
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘जागरूक पालक- सुदृढ बालक’ मोहिमेअंतर्गत पाचवी ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्राचार्य आर. बी गावडे, शिक्षक संभाजी गावडे, चौधरी के. एन्., गावडे आर.एम्. उपस्थित होते.
आजारांनी ग्रस्थ असणाऱ्या मुलांसाठी शस्त्रक्रिया करताना दीड लाख रूपयांपर्यतचा खर्च शासन पातळीवर केला जाईल. त्या प्रमाणे किरकोळ आजारासाठी तपासणी करून औषधे पुरविले जातील, असे शिरूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॅा. सचीन शिंदे यांनी सांगितले. डॅा. रेश्मा शिंदे, सुवर्णा कदम, मंगल पवार यांनी मुलांची आरोग्य तपासणी केली.
यावेळी भारती चाटे,कैलास वाघमारे,प्रसाद मुळे,आशा मोहरे, महादेव गावडे,ज्ञानेश्वर निचित,नाथा पठारे, लक्ष्मण सोदक,रोहिदास मांजरे, अण्णा जाधव, दौलत सोनवणे कोंडीभाऊ चौधरी, राहुल गावडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.