कायम पॉझिटिव्ह अर्थात सकारात्मक राहा असं म्हटलं जातं. पण काही परिस्थितीत नकळतपणे नकारात्मक भावना येतच असतात. भारतात दर 20 पैकी एक व्यक्ती मानसिक समस्येने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. 15 ते 49 वर्षे वयोगटातील बहुतेक लोक या समस्येने ग्रस्त आहेत. पण काही टिप्स फॉलो केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकतं.
समाधानी राहायला शिकावं. व्यक्तीच्या तुलनात्मक वर्तनामुळे त्याच्या आयुष्यात नकारात्मकता निर्माण होऊ लागते. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी तुमच्याकडे जे आहे आणि किती आहे यावर समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. याशिवाय स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वतःची इतरांशी तुलना करू नका. तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. स्वतःची इतरांशी तुलना करताना माणसाचे मन नकारात्मक विचारांनी भरून जाते. म्हणून, आपल्या गरजांवर लक्ष केंद्रित करा आणि इतरांची कॉपी करू नका.
स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःची काळजी घ्या. रोज व्यायाम करा, वेळेवर झोपा, सकस आहार घ्या. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा. हे सर्व केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. जेव्हा आपण नकारात्मक लोकांच्या जवळ असतो, तेव्हा आपली इच्छा नसतानाही नकारात्मक विचार आपल्या मनात डोकावू लागतात. त्यामुळे अशा लोकांसोबत राहा, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात.
इतरांच्या विचारांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. कुटुंब, नातेवाईक किंवा मित्रांनुसार जीवन जगणे थांबवा आणि स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घ्या. इतर लोकांच्या विचारधारा आणि दृष्टिकोनांचा तुमच्यावर प्रभाव पडू देऊ नका. त्यांच्या आवडी-निवडीकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या इच्छेनुसार आयुष्य जगा. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकतं.