आपण वापरत असलेल्या प्रत्येक फोनचा रेडिएशनशी संबंध असतो. याचे प्रमाण मर्यादित असेल तर आरोग्यासाठी काही तोटा नाही. मात्र, याचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुमच्या आरोग्यावर हे गंभीर परिणाम करू शकते. पण, हे रेडिएशन तुम्हाला कुठं जाऊन तपासावं लागणार नाही तर हे घरबसल्या पाहता येऊ शकतं.
जर तुम्हाला तुमच्या मोबाईलचे रेडिएशन तपासायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला मोबाईलवरून *#07# डायल करावे लागेल. हा नंबर डायल करताच मोबाईल स्क्रीनवर रेडिएशनशी संबंधित माहिती दिसेल. यामध्ये रेडिएशनची पातळी दोन प्रकारे दाखवली जाते. एक म्हणजे ‘हेड’ आणि दुसरे ‘बॉडी’. कोणत्याही स्मार्टफोन टॅबलेट किंवा इतर स्मार्ट उपकरणांचे रेडिएशन 1.6 वॅट्स प्रति किलोग्रामपेक्षा जास्त नसावे.
हा नियम शरीरापासून डिव्हाईसच्या 10 मिलीमीटरच्या अंतरावर देखील लागू होतो. फोनवर बोलताना किंवा खिशात ठेवताना तुमचे डिव्हाईस रेडिएशनची ही मर्यादा ओलांडत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.