पुणे : अनेक पदार्थ तुपाशिवाय; अपूर्ण आहेत. अगदी तुपात शिजवण्यापासून ते भरपूर मिठाई बनवण्यापर्यंत, तूप हेल्दी फॅट मानले जाते आणि डिशला एक वेगळी चव आणि सुगंध देते. प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या तूपात आजकाल भेसळ होत आहे. शुद्ध देशी तूपात भेसळ आहे की नाही हे तुम्ही घरीच तपासू शकताशकता
सध्या बाजारात भेसळयुक्त देशी तूप उपलब्ध आहे. त्याची शुद्धता तपासण्यासाठी वाचा या टिप्स.
पॅन मध्ये वितळणे
शुद्धता तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते पॅनमध्ये वितळणे. मध्यम आचेवर पॅन ठेवा आणि थोडा वेळ गरम होऊ द्या. आता त्यात एक चमचा तूप घाला. जर तूप लगेच वितळले आणि गडद तपकिरी रंगाचे झाले तर ते शुद्ध तूप आहे. जर ते वितळण्यास वेळ लागला आणि फिकट पिवळा झाला तर ते भेसळयुक्त आहे.
डबल बॉयलर प्रोसेस वापरा
देशी तुपात नारळाचे तेल अनेकदा मिसळले जाते. या प्रकरणात भेसळ तपासण्यासाठी, काचेच्या भांड्यात थोडं तूप घाला आणि डबल बॉयलर प्रक्रिया वापरून ते वितळवा. आता हे मिश्रण एका बरणीत टाका आणि काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. थोड्या वेळाने तूप वेगवेगळ्या थरांत घट्ट झाले तर तुपात भेसळ आहे.
तळहातावर ठेवून तपासा
देशी तूप तपासण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे हाताव चाचणी करणे. तुमच्या तळहातात एक चमचा तूप ठेवा आणि ते वितळेपर्यंत काही वेळ थांबा. तूप वितळायला लागले तर ते शुद्ध आहे. आणि तसेच राहिले तर त्यात भेसळ आहे.
केमिकल वापरा
तुम्ही टेस्टिंग ट्यूबमध्ये एक चमचा तूप टाका आणि गरम करा. आता चिमूटभर साखरेसोबत समान प्रमाणात कॉन्सेंट्रेटेड एचसीएल मिक्स करा. टेस्ट ट्यूब हलवा आणि सर्व मिक्स करा. खालच्या थरात गुलाबी किंवा लाल रंगाचे दाणे दिसले तर तुपात भेसळ आहे.