पुणे : हिवाळ्यात वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण पाण्याची कमतरता आहे. यामुळे रक्ताभिसरण संकुचित होते. यामुळे धमन्यांद्वारे रक्त प्रवाहात अडचणी येतात आणि बीपी वाढतो. पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदू आकुंचित होतो.
यामुळे डोकेदुखी होऊ लागते. अशा स्थितीत औषध घेण्याऐवजी भरपूर पाणी प्या. पाण्याच्या कमतरतेमुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो आणि लकवाही होऊ शकतो.
हिवाळ्यात जुने आजार डोके वर काढतात. नवे बळावतात. कारण इन्फ्लूएंझा आणि विषाणू दोन्ही जास्त सक्रिय होतात. याच कारणामुळे या हवामानात मृत्यू दर वाढतो. त्यामुळे अतिरिक्त काळजी घेण्याची गरज आहे.
अमेरिकेच्या हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये नेफ्रॉलॉजी विभागातील डाॅ. रामशंकर उपाध्याय म्हणाले, हिवाळ्यात घाम येत नाही त्यामुळे तहानही लागत नाही. त्यामुळे शरीराला पाण्याची गरज आहे याची जाणीव होत नाही.
यानंतर शरीराचे निर्जलीकरण होऊ लागते. यामुळे किडनीवर परिणाम होतो. त्यात क्रियाटीनीन जमा होऊ लागते. यामुळे रेबडोमायसिस आजार होतो. शरीरात सूज येऊ लागते. मांसपेशी कमकुवत होतात आणि वजन वाढते.
दमा आणि रुग्णांसाठी या हवामानात सतर्कता आवश्यक आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे म्यूकस वाढते. यामुळे फुप्फुसात पाणी जमा होऊ लागते. छाती किंवा पोटात वेदना होतात. डॉ. उपाध्याय यांनी सल्ला दिला की, पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा. थोड्या-थोड्या वेळाने पाणी पीत राहा.
या हवामानात ताजी फळे आणि भाज्या जास्त खा. ग्रीन टी प्या. कोल्ड ड्रिंक, चहा आणि कॉफीपासून दूर राहा. कॅफिन घटक असणरे पदार्थ घेऊ नका. जे लोक खूप पाणी पितात ते दीर्घकाळापर्यंत तरुण राहतात. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाहीत.
हिवाळ्यात निरोगी व्यक्ती ६-८ वेळा लघवीला जातो. यात घट झाल्यास शरीरात पाणी कमी झाल्याचे समजून घ्या. यामुळे लघवी घट्ट पिवळसर होते. शरीराला खाज येऊ लागते. थकवा आणि आळस वाटतो. अनेकदा गोड खावेसे वाटते. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर ग्लायकोजन तोडून ग्लुकोज बनवू शकत नाही. यानंतर साखरेसाठी आपण चॉकलेट किंवा मिठाई खाऊ लागतो.