आपल्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष देत असाल तर काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. तसेच जर तुम्ही दररोज धावण्याला प्राधान्य देत असाल तर तुम्हाला किती धावलं पाहिजे हे देखील माहिती असणे आवश्यक आहे. याचीच माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.
त्येक व्यक्तीने त्याच्या वयानुसार आणि शरीरानुसार धावणे आणि आहाराचे पालन केले पाहिजे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एका अहवालानुसार, जर एखाद्या पुरुषाचे वय 30 वर्षांच्या आसपास असेल तर त्याने 1.9 किलोमीटरपर्यंत धावले पाहिजे, तर त्याच वयाची एक महिला 1.7 किलोमीटरपर्यंत धावू शकते. जर पुरुष 2.6 किलोमीटर आणि स्त्रिया 30 वर्षांच्या वयात 2.5 किलोमीटर धावू शकत असतील, तर त्यांची VO2 कमाल चांगली मानली जाईल.
त्यात 20 ते 29 वर्षे या वयातील पुरुषांनी 2800 मीटर धावल्यास ते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. 30-39 वर्षे या वयोगटातील पुरुषांनी किमान 2300 ते 2700 मीटर धावावे आवश्यक आहे. तसेच 40 ते 49 वर्षे या वयोगटातील पुरुषांसाठी 2100 ते 2500 मीटर धावणे आवश्यक आहे. तर 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांसाठी, 2000 ते 2200 मीटर धावणे पुरेसे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.