Healthy Tips | डार्क चॉकलेट चवीने कडू असले तर त्याचे फायदे नक्कीच चांगले आहे. डार्क चॉकलेटमध्ये विशिष्ट प्रमाणात कॅफीन आणि थियोब्रोमाइन असते. यामुळे ऊर्जा वेगाने वाढते. त्यामुळे रक्तदाब कमी असेल, उदास वाटत असेल, सुस्ती आली असेल तेव्हा डार्क चॉकलेट अवश्य खावे.
जाणून घ्या डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे –
१. डार्क चॉकलेटमध्ये सेरोटोनिन, न्यूरोट्रांसमीटर आणि ट्रिप्टोफॅन ही मानसिक आनंद देणारी रसायने असतात. त्यामुळे मूड सुधारतो.
२. डार्क चॉकलेटमधील काही घटक उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे नियमितपणे डार्क चॉकलेट खाल्ल्याने व्यक्तीला हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते.
३. डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लावेनॉईडस् रक्तातील साखर कमी करण्यास सहायक असतात. शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट उपयुक्त आहे.
४. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवोनोइड्स आणि कोको असते. हे ‘अँटिऑक्सिडंट्स’ म्हणून काम करतात. यामुळे सूज आणि दुखणे कमी होण्यास मदत होते.यामुळे संवेदनक्षमता सुधारते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health : ॲसिडिटीच्या समस्येवर घरगुती उपाय, जाणून घ्या
Healthy Tips | उभं राहून पाणी का पिऊ नये, जाणून घ्या शास्त्रीय कारणे
Health Care | सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे करा सेवन आणि मिळवा अनेक फायदे