पुणे : वाढते प्रदूषण चुकीचा आहार आणि त्वचेच्या काळजीमध्ये निष्काळजीपणामुळे त्वचेची एलर्जी सुरू होते.यामुळे त्वचेवर खाज,जळजळ,पुरळ या समस्येला सामोरे जावे लागते.कधीकधी आपल्याला वेदनांनी सामोरे जावे लागते.तज्ज्ञांच्या मते ही एलर्जी काही दिवसातच बरी होते.पण अनेक बाबतीत ते गंभीर स्वरूप धारण करते.अशा परिस्थितीत त्वच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले आहे.पण साधारण एलर्जी असल्यास घरी उपाय करून बरे होऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ उपाय..
टी ट्री ऑयल-
टी ट्री तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ते लावल्याने मुरुम, डाग,पुरळ,सुरकुत्या इत्यादी समस्यांपासून सुटका मिळते. यासह ते त्वचेला मऊ व पोषण देते आणि त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम देते. त्यात असलेले बॅक्टेरियाविरोधी, बुरशीविरोधी, दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी घटक एलर्जीची समस्या कमी करतात. तज्ज्ञांच्या मते, त्वचेची जळजळ, खाज सुटणे,लालसरपणा इत्यादी बाबतीत टी ट्री तेल लावणे फायदेशीर मानले जाते.आहे.यासाठी कापसामध्ये टी ट्री तेलाचे काही थेंब घ्या आणि प्रभावित भागात लावा.
एलोवेरा जेल-
त्वचेच्या ऍलर्जी मुळे,जळजळ,खाज,पुरळ,वेदना इ. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही एलोवेराजेल चा वापर करू शकता. कोरफडीमध्ये बॅक्टेरियाविरोधी, बुरशीविरोधी, अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. हे त्वचेचे खोल पोषण देतात आणि त्याच्याशी संबंधित समस्यांपासून मुक्त सुटका होते. यासह, त्वचेचा रंग चमकदार आणि तरुण दिसतो. तुम्ही दिवसभर कधीही एलोवेरा जेलने चेहरा आणि एलर्जीक असलेला भागची मसाज करू शकता. झोपण्यापूर्वी एलोवेरा जेल लावणे सर्वोत्तम मानले जाते.
सफरचंद सायडर व्हिनेगर –
सफरचंद सायडर व्हिनेगर खाण्याबरोबरच ते त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते.तज्ज्ञांच्या मते हे एक चांगले स्किन केअर एजंट म्हणून काम करते.त्यात असलेले एसिटिक एसिड त्वचेची एलर्जी दूर करण्यासाठी प्रभावी आहे. त्वचेवर जळजळ, पुरळ, खाज इत्यादी असेल तर आपण सफरचंद सायडर व्हिनेगर वापरू शकता.यासाठी १ चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर एक कप कोमट पाण्यात मिसळा.तयार झालेले मिश्रण कापसाच्या मदतीने प्रभावित भागावर लावा.आणि कोरडे होऊ द्या. नंतर ते थंड पाण्याने स्वच्छ करा आणि कोरडे करा. असे काही दिवस केल्याने एलर्जीची समस्या दूर होईल. परंतु संवेदनशील त्वचा असलेल्यांनी ते वापरणे टाळावे.