Health Tips : खारीकमध्ये प्रोटीन, कॅलरीज, कार्बाेहायड्रेट, फायबर, साखर यांसारखे पौष्टिक घटक असतात. खारीकचे सेवन शरीरासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. जाणून घ्या खारीक खाण्याचे फायदे – (Kharik boon for healthy and glowing skin, know the benefits of eating kharik)
खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात
निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी खारीक हे वरदान आहे. (Health Tips ) खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट घटक असतात जे त्वचेला तरुण तर ठेवतातच शिवाय त्वचेच्या इतर समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम करतात.
खारीकमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन असते. (Health Tips ) यामुळे केस गळती कमी होऊन केसांची वाढ होण्यास मदत होते.
खारीकमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनसंस्था व्यवस्थित राहते. पचनसंस्थेशी संबंधित समस्या असतील तर खारीक नियमितपणी खावी.
खारीकमध्ये असणारे कोलीन व व्हिटॅमिन बी स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात.
अशक्तपणा जाणवत असलं तर खारीक खा. खारीक खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते.
खारीकमध्ये फॉस्फरस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम असे घटक असतात. (Health Tips ) नियमित खारीक खाल्ल्याने हाडे मजबूत आणि बळकट होतात.
नियमित खारीक खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. ऍनेमिया कमी होतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : उचकी थांबवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
Health Insurance : आरोग्य विमा पॉलिसी घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची अवश्य करा तपासणी
Health Tips : दृष्टी सुधारण्यासाठी पपई गुणकारी, जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे