Health Tips : आपण घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये असताना जर आपल्या आसपास असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक खराब झाली, तर त्यासाठी प्रसंगावधान राखून उपाययोजना करणे अतिशय आवश्यक असते. वेळीच उपचार केले गेल्याने परिस्थिती आटोक्यात येते. पण काही विकार अगदी अचानक उद्भवतात. हे विकार गंभीर स्वरूपाचे असल्याने आणि यासाठी करावयाच्या उपचारांबद्दल फारशी माहिती नसल्याने प्रसंग हाताबाहेर जातो, आणि हा विकार उद्भवलेल्या व्यक्तीच्या जीवावरही बेतू शकते. अचानक कोणाला आलेला हृदयविकाराचा झटका हे अशा प्रसंगाचे उदाहरण म्हणता येईल.
आपल्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास, त्या व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत काही उपाय आपण करू शकता. (Health Tips) यासाठी स्वतः घाबरून न जाता, आपल्या आसपासच्या इतर व्यक्तींना आपल्या मदतीकरिता ताबडतोब बोलावून घ्या.
हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला जमिनीवर सरळ झोपवा. त्याच्या शरीरावरील कपडे, बेल्ट इत्यादी घट्ट वस्तू सैल करा. (Health Tips) हृदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती शुद्धीत आहे किंवा नाही हे पाहावे. जर व्यक्ती बेशुध्द असेल, तर त्याच्या नाकाजवळ आपला हात नेऊन त्याचा श्वासोच्छ्वास चालू आहे किंवा नाही हे तपासावे.
रूग्णाची पल्स तपासावी. जर त्याचा श्वासोच्छ्वास होत नसेल किंवा पल्सही लागत नसेल, तर अशावेळी रुग्णाला सीपीआर देण्याची आवश्यकता असते.
सीपीआर कसा द्यावा?
सीपीआर देण्यासाठी आपला उजवा हात रुग्णाच्या छातीच्या मधोमध ठेऊन उजव्या हातावर डावा हात ठेवावा व दोन्ही हातांनी पूर्ण प्रेशरने छाती दाबावी. (Health Tips) या प्रक्रियेला कम्प्रेशन असे म्हणतात. ही प्रक्रिया जलद गतीने करायची असते. एका मिनिटामध्ये शंभर कम्प्रेशन्स या गतीने ही प्रक्रिया करावयची असते. तसेच वैद्यकीय तज्ञ अथवा रुग्णवाहिका मिळेपर्यंत ही प्रक्रिया चालू ठेवावी. असे केल्यास संबंधित रुग्णाचा जीव वाचू शकतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : सकाळी रिकाम्यापोटी पाणी पिण्याचे आहेत अनेक फायदे
Health Tips : जास्त सडपातळ असणे घातकच; वाढू शकतो आजारांचा धोका
Health Tips : संधिवाताने आहात त्रस्त? तर आजपासून ‘हे’ करा अन् राहा मुक्त !