Health Tips | कधी कधी लहान मुलं दूध पिण्याचा कंटाळा करतात. मुलांनी दूध प्यावं म्हणून चॉकलेट पावडर, हॉर्लिक्स असे काही पदार्थ दुधात किंवा दुधासोबत वेगवेगळे पालक देतात. मात्र काही असे पदार्थ आहेत जे दुधासोबत देणं आरोग्यासाठी हानिकारक असत.
जाणून घ्या मुलांना दुधासोबत कोणते पदार्थ खायला देणे टाळावे
१. दूध आणि खरबूज एकत्र केल्याने त्यातील ऍसिड आणि दुधातील प्रोटीन एकत्र येतात. यामुळे दूध आंबू शकते. यामुळे पचनसंस्था आणि इतर समस्या उ्द्भवू शकतात.
२. मुलांना द्राक्ष खायला दिल्यानंतर तासभर दूध पिणे टाळा. दुधात असलेले प्रोटीन द्राक्षांच्या आम्लयुक्त स्वभावाच्या आणि त्यात असलेल्या व्हिटॅमिन सीच्या उच्च पातळीच्या संपर्कात आल्यावर आंबते. या संयोगामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल, शारीरिक अस्वस्थता, वेदना आणि अतिसार देखील होऊ शकतो.
३. लहान मुलांना दूधासोबत आंबट फळं, आंबट पदार्थ खायला देऊ नये. मोसंबी, संत्री, लिंबू यांसारख्या आंबट फळांमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे दूधातील प्रथिने जमा होतात आणि पचनक्रिया बिघडते. यामुळे गॅस, पोटात दुखणे, पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात.
४. पालकांनी आपल्या मुलांना दूधसोबत चिप्स, वेफर्स आणि इतर खारट स्नॅक्स देणे टाळावे. हे खारट पदार्थ दूधासोबत खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health Care | थकवा,अशक्तपणा कमी करण्यासाठी खा खजूर, जाणून घ्या खजूर खाण्याचे फायदे
Health : उन्हाळ्यात थकवा आणि सुस्तपणा दूर करण्यासाठी आहारात करा ;हे बदल
Health | हायब्लडप्रेशर असताना ;ही काळजी अवश्य घ्या