Health Tips : माणसाचं वय जसजसं वाढू लागतं, तसतसं आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण होते. त्यामुळे पोषक आहार, चालणे आणि नियमित व्यायाम केल्यास याचा फायदा होणार हे नक्की. पण साठीमध्ये विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. वयाची साठ वर्षे ओलांडणाऱ्या व्यक्तीने काय करायला हवे याची माहिती आपण घेणार आहोत…
‘या’ गोष्टी कटाक्षाने पाळा
उच्च रक्तदाबावर नियंत्रण हवेच
कित्येकदा पस्तीस टक्के लोकांना त्यांना उच्चरक्तदाब आहे, याची जाणीव नसते. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष होते आणि मग योग्य ती ट्रीटमेंट त्यांना मिळत नाही. (Health Tips) अस्थिरता आणि उच्च रक्तदाब यात अनेकदा गल्लत होते. एका ठिकाणी काम करू न शकणाऱ्या अस्थिर मंडळींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, असे वाटते. प्रत्यक्षात ते खरे नाही. हा गैरसमज आहे. कित्येकदा वर वर पाहता शांत दिसणाऱ्या मंडळींना उच्च रक्तदाबाचा त्रास असू शकतो.
चयापचय क्रिया
आपल्याला खूप घाम आला म्हणजे आपल्या शरीरातील ऊर्जा (कॅलरीज) वापरली गेली, असा काहीसा समज असतो. मात्र, ही गोष्ट काही खरी नाही. (Health Tips) कारण आपली चयापचय क्रिया सातत्याने म्हणजे तेव्हाही सुरूच असते. चयापचय म्हणजे आपल्या शरीराचे कार्य संतुलित ठेवण्यासाठी ठराविक ऊर्जेचे उष्मांकात रूपांतर होणे. म्हणूनच म्हातारपणाकडे झुकताना काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.
खाताना पुस्तक वाचणे टाळावे
वाचनाची सवय चांगली असते. मात्र, जेवताना पुस्तक वाचणे ही गोष्ट अयोग्य आहे. कारण असे करताना लक्ष त्या पुस्तकातच असते. त्यामुळे कधीकधी पोट भरलेले असतानाही सतत खात राहतो. सतत आणि वेळी-अवेळी खात राहिल्याने तुमच्या चयापचय क्रियेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. सावकाश खावे. प्रत्येक घास चावून खा. गिळू नका.
भरपूर पाणी प्या
अचानक पोटात भुकेने कावळे ओरडतात तेव्हा किती खाऊ आणि किती खाऊ, असे होते. याचा अर्थ प्रत्येक वेळेला भूक लागल्यावर काही खाल्लेच पाहिजे असे नाही. कारण कधी कधी भूक लागते, तेव्हा शरीरालादेखील पाण्याची गरज असते. त्यामुळे भूक लागल्यासारखी वाटते. (Health Tips) अशावेळी आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. ज्या पदार्थात पाणी जास्त आहे, असे पदार्थ म्हणजे कलिंगड, संत्रे, अननस, टोमॅटो आणि काकडी यांसारखी रसदार फळे किंवा फळभाज्या खाव्यात. यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज वाढणार नाहीत. शिवाय तुमचे वजनही आटोक्यात राहील.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : ब्लडप्रेशर नियंत्रणासाठी फायदेशीर आहे डार्क चॉकलेट
Health Tips : पित्तामुळे आहात त्रस्त? ‘हे’ घरगुती उपाय करा अन् आराम मिळवा
Health Tips : पावसाळ्यातही तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता… हे उपाय नक्की फॉलो करा!