Health Tips : पोटावर अनावश्यक चरबी साठल्यास शरीर बेढब दिसतेच शिवाय पोटावर अतिरिक्त असणाऱ्या चरबीमुळे शरीराला हालचाल करताना त्रास होतो. मात्र नियमित योगा केल्याने ही समस्या कमी होऊ शकते. जाणून घ्या पोटावर अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी कोणती योगासने करावीत – (Follow these ‘remedies’ to reduce unnecessary belly fat)
भुजंगासन आणि नौकासन या योगासनांच्या नियमित सरावामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. (Health Tips)जाणून घ्या भुजंगासन आणि नौकासन कसे करावे याविषयी माहिती –
भुजंगासन आणि नौकासन कसे करावे
नौकासन आसन करण्याची पद्धती
सर्व प्रथम पोटावर झोपा. पाय जुळलेले असावेत. हात शरीराजवळ ठेवा.
पूर्ण श्वास सोडावा आणि श्वास घेत दोन्ही हात आणि पाय एकाचवेळी जमिनीपासून ३० अंश वर उचलावे. (Health Tips)याच स्थितीत अर्धा ते १ मिनिट थांबा.
हळूहळू पूर्वस्थिती या.
भुजंगासन आसन करण्याची पद्धती
चटईवर किंवा योगा मॅटवर पालथं झोपा. दोन्ही पाय सरळ आणि ताठ ठेवा तसेच दोन्ही पायांचा एकमेकांना स्पर्श केलेला असावा. आता दोन्ही हात छातीच्या जवळ ठेवा. (Health Tips)कपाळ जमिनीला लावा. त्यानंतर हळुवारपणे शरीराचा वरील भाग वर उचलावा.
शरीराचा वरील भाग वर उचलताना श्वास घ्यावा. नंतर मागे बघावं. (Health Tips) आता स्थितीत नियमित श्वासोच्छ्वास ठेवावा. दोन्ही हात कोपरातून थोडे वाकवावेत. भुजंगासनामध्ये जेवढे शक्य आहे तेवढेच शरीर वर उचलावे. शरीराचा वरील भाग खाली घेताना श्वास सोडावा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Healthy Tips | थंड पाणी पिणे बंद केले नाही तर तुम्हाला अनेक धोकादायक आजार होऊ शकतात…
Health News : फ्रीजरमध्ये ‘हे’ पदार्थ ठेवू नयेत अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान