Health Tips : केसांच्या आरोग्यासाठी अंजीर तेल गुणकारी, जाणून घ्या कसे बनवावे याविषयी माहितीअंजीरमधील पोषक तत्व केस वाढण्यास मदत करतात. अंजीरमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-सी आणि ई सारख्या गुणधर्म आहेत. ज्यामुळे केसांना चांगली वाढ मिळते. अंजीर आपल्या केसांसाठी कसे गुणकारी आहे. अंजीर आरोग्यासाठी तसेच केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंजीर तेल एक उत्तम कंडिशनर आहे, जे तुमचे केस तुटण्यापासून रोखते. अंजीर केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे अंजीर तेल टाळूमध्ये रक्तप्रवाह वाढवतो.
अंजीर तेल एक उत्तम कंडिशनर
केसांच्या वाढीसाठी अंजीर फायदेशीर आहे. अंजीराचे हे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही रोज 2 अंजीर खायला हवेत. भिजवलेल्या अंजीरांचे सेवन केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतात. (Health Tips) याशिवाय तुम्ही अंजीर तेलही केसांसाठी वापरू शकतात. जाणून घ्या अंजीर तेल बनविण्याची पद्धत –
सर्व प्रथम, दोन चमचे दह्यात दोन चमचे बेसन मिसळून त्याची पेस्ट तयार करा
– या पेस्टमध्ये अंजीर तेलाचे 10 थेंब मिसळा, त्यानंतर पेस्ट केसांना तासभर लावा
– यानंतर तुम्हाला तुमचे केस शॅम्पूने धुवावे लागतील
– अंजीर तेलाची ही कृती केसांना लांब आणि मजबूत बनवते
– तुम्ही हा उपाय आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता.