Health Tips : पाणी हे कोशिकांच्या माध्यमातून पोषकतत्व आणि ऑक्सिजन पोहोचवतं. यासोबतच पाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आपलं शरीर निरोगी आणि फिट ठेवण्यात पाणी महत्वाची भूमिका बजावतं. मानवी शरीरात पाण्याचं प्रमाण 50-60 टक्के असतं. सकाळी उठून रिकाम्यापोटी पाणी प्यायल्यास त्याचेही अनेक फायदे होतात.
जाणून घ्या अन् लगेच सुरु करा…
जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा आपल्या शरीराला पाण्याची अत्याधिक गरज असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर 2 ते 3 ग्लास पाणी प्यायला हवं. सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात. यामुळे रक्त शुद्ध होतं. (Health Tips) रक्त शुद्ध झाल्याने त्वचेवर चमक येते. शरीराची स्वतःची एक सुरक्षा यंत्रणा असते जी इन्फेक्शन आणि खराब कोशिकांशी लढण्यात मदत करतात. सकाळी पाणी प्यायल्याने इन्फेक्शनसोबत लढण्याची क्षमता वाढते.
जपानी मेडिकल सोसायटीनुसार, रिकाम्यापोटी सकाळी पाणी प्यायल्याने तुम्हाला डोकेदुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, वाढतं वजन, अस्थमा, टीबी, किडनी आणि लघवीच्या आजारांचा उपचार होण्यास मदत मिळते. सकाळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म सक्रिय होतो. (Health Tips) त्यामुळे वजन कमी करण्यातही तुम्हाला मदत मिळते. सकाळी उठून पाणी प्यायल्याने नवीन कोशिकांची निर्मिती होते. यासोबतच मांसपेशींमध्ये मजबूती येते. सकाळी उठून पाणी प्यायल्याने गळा, मासिक पाळी, डोळे, लघवी आणि किडनीसंबंधी समस्या दूर होतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : जास्त सडपातळ असणे घातकच; वाढू शकतो आजारांचा धोका
Health Tips : संधिवाताने आहात त्रस्त? तर आजपासून ‘हे’ करा अन् राहा मुक्त !
Health Tips : पावसाळ्यात ‘हे’ उपाय करा अन् मुलांना व्हायरल फिव्हरपासून दूर ठेवा