Health Tips : चॉकलेट हा एक असा गोड पदार्थ आहे जो आपल्याला जास्तीत जास्त वेळ ऊर्जा देतो आणि शरीरातील साखरेची पातळी संतुलित करतो. चॉकलेट हा तसा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. या चॉकलेटमध्ये असा काही घटक असतो तो आपला मूड देखील सुधारू शकतो.
अँटिऑक्सिडेंटस् जास्त प्रमाणात असतात
लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही चॉकलेट खाणे आवडते. ते खाण्यासाठी आता एक चांगले कारणही मिळाले आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, (Health Tips ) डार्क चॉकलेटचे सेवन हे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करू शकते. डार्क चॉकलेट खाल्ल्याने डोकं शांत राहून उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडेंटस् जास्त प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
स्वीडनच्या एका संशोधकाने सांगितले की, (Health Tips ) डार्क चॉकलेट शरीरात त्याचप्रमाणे परिणाम करते जसे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी घेणारी एखादी गोळी. डार्क चॉकलेटमध्ये बऱ्याच मात्रेत कोकोवा असतो, ज्यात केटेचिन्स आणि प्रोसाइनीडाईन्स जास्त प्रमाणात असतात, जे रक्तदाबाला प्रभावित करतात.
संतुलित आहार आणि धूम्रपानापासून दूर राहून डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने हृदयरोगावर फायद्याचे ठरू शकते. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. या डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने ताण-तणाव देखील कमी होण्यास मदत मिळते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : पित्तामुळे आहात त्रस्त? ‘हे’ घरगुती उपाय करा अन् आराम मिळवा
Health Tips : पावसाळ्यातही तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता… हे उपाय नक्की फॉलो करा!
Health Tips : तुतीचे फळ खाण्याचे फायदे