Health Tips : दररोज तळपायाची मालिश केली पाहिजे. तळपायाची मालिश केवळ वेदना कमी करण्यात आणि थकवा दूर करण्यात मदत करत नाही तर इतर अनेक मार्गांनी आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. तळपायाची मालिश करण्यासाठी तीळाचे तेल वापरावे. महत्त्वाचे म्हणजे तेल गरम करूनच तळपायाची मालिश करावी. जाणून घ्या दररोज तळपायाची मालिश करण्याचे फायदे –
आरोग्यासाठी फायदेशीर
डोळ्यांच्या संबंधित तक्रारी दूर होतात
रोज तळपायाची मालिश केली तर डोळ्यांच्या संबंधित तक्रारी दूर होतील. त्यामुळे नजर चांगली होईल.
वाताची समस्या
ज्या लोकांना वाताची समस्या आहे अशा लोकांनी तर रोज तळपायाची मालिश करावी. (Health Tips) तळपायाची मालिश केल्याने या समस्येपासून तुमची सुटका होईल.
थकवा दूर होतो
तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा ताण येत असेल तर तळपायाची मालिश करा. त्यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते.
शांत आणि लवकर झोप लागते
शांत झोप लागण्यासाठी तळपायाची रोज मालिश करा. झोपेआधी तळपायाची मालिश करा. (Health Tips) तुम्हाला शांत आणि लवकर झोप लागेल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : चष्मा घालून नाकावर डाग पडलेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पहा
Health Tips : पित्ताच्या त्रासावर आवळा गुणकारी, जाणून घ्या नियमित आवळा खाण्याचे फायदे
Health Tips : मूड फ्रेश राहण्यासाठी चालवा सायकल, जाणून घ्या सायकल चालविण्याचे फायदे