Health Tips : मुंबई : बदलती जीवनशैली, फास्टफूडला प्राधान्य आणि व्यायामाचा अभाव तसेच बैठे काम अशा कारणांमुळे लठ्ठपणा वाढण्यास मदत मिळते. यामुळे मानवी शरीर आजारांचे आगार बनते. यासाठीच विशेषज्ञ लोक वजन कमी करण्याचा सल्ला देत असतात. हल्ली ‘झिरो फिगर’ म्हणजे सडपातळ होण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी काहीवेळा अवघड डायटही अवलंबिला जातो. मात्र, प्रमाणापेक्षाही जास्त सडपातळ होण्यामुळेही अनेक आजारांचा धोका वाढतो, असा एका नव्या संशोधनात निष्कर्ष काढण्यात आला आहे.
नव्या संशोधनातील निष्कर्ष
जगभरात सध्या लठ्ठपणाची एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह अशा काही घातक आणि गंभीर आजारांचा धोका बळावतो. (Health Tips) थोडं जरी खाल्ले तरी काही लोकांचे वजन वाढते. मात्र, काहींनी कितीही खाल्ले तरी ते त्यांच्या शरीराला लागत नाही. तसेच त्यांचे वजनही गरजेपेक्षा कमी असते. मात्र, ही समस्या शरीरासाठी जास्त घातक ठरण्याची शक्यता असते. अशा स्थितीत संबंधिताला काही आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.
गरजेपेक्षा जास्त सडपातळ असल्यास व्यक्तीच्या शरीरात पोषकतत्त्वांची जास्त कमतरता भासू लागते. अशा अवस्थेत व्यक्तीला अशक्तपणा, थकवा येणे, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे, दात कमकुवत होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. (Health Tips) या समस्या वाढल्यास हीच लक्षणे पुढे गंभीर आजाराची कारणे बनू शकतात. समतोल आहार आणि नियंत्रित वजन असल्यास अनेक आजारांच्या विळख्यात अडकण्यापासून शरीराचा बचाव होतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : संधिवाताने आहात त्रस्त? तर आजपासून ‘हे’ करा अन् राहा मुक्त !
Health Tips : पावसाळ्यात ‘हे’ उपाय करा अन् मुलांना व्हायरल फिव्हरपासून दूर ठेवा