Health Tips : पित्त किंवा ॲसिडीटीची अनेक कारणे सांगितली जातात. मात्र, पित्त उसळले की पोटातील जळजळ, छातीतील जळजळ, क्वचित कधी उलटी यांनी आपण हैराण होऊन जातो. रात्रीचे जागरण, खूप काळ उपाशी राहणे, फास्ट फूडचे सेवन, वेळी अवेळी खाणे, अनियमित दिनचर्या व वेदनाशामक गोळ्यांचे सेवन ही पित्त वाढण्याची मुख्य कारणे सांगितली जातात.
सोपे सहज उपाय करून ॲसिडीटीवर आराम मिळू शकतो
मात्र, घरच्या घरीच अगदी सोपे सहज उपाय करून ॲसिडीटीवर आराम मिळू शकतो. ॲसिडीटी झाली असेल तर काहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खावा. (Health Tips) ॲसिडीटीपासून त्वरीत आराम मिळतो. सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने ॲसिडीटी कमी होते. खाण्यानंतर लवंग चघळण्यानेही ॲसिडीटीतून आराम मिळतो.
नेहमी ॲसिडीटीचा त्रास होणाऱ्या लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खाव्यात व त्यावर थोडे पाणी प्यावे. (Health Tips) रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळली तरी पित्त कमी होते.
निममित तुळशीच्या पांनाचे सेवन ॲसिडीटी मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे. (Health Tips) जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्ल्यानेही पित्त कमी होते. तसेच मुळ्यावर लिंबू व काळेमीठ घालून खाल्यानेही ॲसिडीटीपासून आराम मिळतो. मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : पावसाळ्यातही तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता… हे उपाय नक्की फॉलो करा!
Health Tips : तुतीचे फळ खाण्याचे फायदे
Health Tips : चेहरा अधिक चमकदार आणि तरुण दिसण्यासाठी चेहऱ्याला द्या वाफ