Health Tips : रोज एक आवळ्याची फोड खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. जाणून घेऊयात नियमित आवळा खाण्याचे फायदे -(Amla is beneficial for pitta problems, know the benefits of eating amla regularly)
अशक्तपणा, मधुमेह, पोटाचा त्रास असणाऱ्यांनी नियमित आवळा खावा.
पित्ताचा त्रास
पित्ताच्या त्रासावर आवळा अतिशय गुणकारी आहे. पित्ताचा त्रास असेल तर नियमितपणे आवळा कॅण्डी, आवळा सुपारी किंवा आवळा ज्यूस घ्यावा.
अशक्तपणा, मधुमेह
अशक्तपणा, मधुमेह, पोटाचा त्रास असणाऱ्यांनी नियमित आवळा खावा.
स्मरणशक्ती वाढते
आवळ्यामुळे स्मरणशक्ती वाढते.
रक्त संचारात गती येते
शरीर सुस्त राहत असेल, तर आवळ्याच्या सेवनाने रक्त संचारात गती येते. (Health Tips) आवळ्यात अँटी ऑक्सीडंटस मोठ्या प्रमाणात असतात.
तारुण्य टिकून राहते
आवळा शरीरातील पेशींचे आयुष्य वाढवण्याचे कार्य आणि फ्री रेडिकल कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे तारुण्य टिकून राहते.
हिरड्या मजबूत होतात
नियमित एक कच्चा आवळा खाल्ल्याने हिरड्या मजबूत होतात.
शरीराची उष्णता कमी होते
शरीराची उष्णता कमी करण्यासाठी आवळा उपयोगी आहे.
ह्रदय निरोगी राहते
नियमितपणे आवळ्याचे सेवन केल्याने कॉलेस्टॉरॉल कमी तयार होते (Health Tips) आणि ह्रदय निरोगी राहते.
रक्तवाहिन्या मजबूत होतात
एक आवळा रोज खाल्ल्याने रक्तवाहिन्या मजबूत होतात.
रक्तातली साखरेची पातळी मर्यादेत राहते
आवळ्याच्या नियमित सेवनाने रक्तातली साखरेची पातळी मर्यादेत राहते. (Health Tips) त्यामुळे मधुमेहाचा त्रास थोड्या प्रमाणात कमी होतो.
सर्दी पडसे
नेहमीच सर्दी पडसे होत असेल तर २ चमचे आवळ्याचा रस आणि २ चमचे मध रोज सकाळी नियमित एकत्र करून घेतल्यास अराम मिळतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : मूड फ्रेश राहण्यासाठी चालवा सायकल, जाणून घ्या सायकल चालविण्याचे फायदे
Health Tips : फायबरयुक्त पदार्थ खाण्याचे फायदे
Health Tips : सकाळी उपाशी पोटी चहा पिणे आरोग्यास हानिकारक, जाणून घ्या कारणे