Health पुणे : अल्झायमर हा एक मेंदूचा आजार आहे. हा मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट करतो आणि कालांतराने गंभीर होतो. अल्झायमर हा एकप्रकारे विसरण्याचा आजार आहे. याचे नाव अलॉईस अल्झायमरवरून ठेवण्यात आले. अल्झायमरचा सर्वाधिक परिणाम वृद्धांवर होतो, असे मानले जाते. परंतु, जगभरात 30 ते 64 वयोगटातील 3.9 दशलक्ष लोक अल्झायमर आजाराने ग्रस्त आहेत. हा आजार 30 वर्षांच्या तरुणांना देखील होऊ शकतो. फक्त त्याची लक्षणे वेगळी आहेत. (Health)
एका नवीन अभ्यासानुसार, अल्झायमर असलेल्या तरुणांमध्ये फोकस कमी होणे, हाताच्या जेश्चरची नक्कल करण्याची क्षमता कमी होणे आणि कमकुवत जागरूकता यासारखी वेगवेगळी लक्षणे दिसतात. त्यामुळे तरुण वयातच व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल होऊ लागते.
वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, तारुण्यात अल्झायमर पीडितांच्या मेंदूत वेगाने बदल दिसून येतात. उशिरा सुरू होणाऱ्या अल्झायमर रोगापेक्षाही ते अधिक आक्रमक असू शकतात. तरुण वयात अल्झायमर असलेल्या लोकांना त्यांच्या मेंदूच्या क्रियाकलापांमधील बदलांची अधिक जाणीव असते. तरुण वयात होणारा अल्झायमर हा आजार जास्त घातक असतो. तो आठ पट वेगाने वाढतो. या आजाराचे सर्वात मोठे कारण म्हणजे आनुवंशिकता. (Health)
पौष्टिक आहार घेतल्यास धोका कमी
डॉक्टरांच्या मते, नियमित दिनचर्या, नियमित व्यायाम किंवा शेत आणि बागेत कामात व्यस्त राहून आणि पौष्टिक आहार घेतल्यास अल्झायमरचा धोका कमी करता येतो. अल्झायमरची सुरुवात डिमेंशियापासून होते, ज्याला स्मृती कमी होणे म्हणतात. यामागचे कारण अद्याप पूर्णपणे कळू शकलेले नाही, परंतु काही संशोधनांमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिने, किंवा डोक्याला दुखापत किंवा जनुकीय विकार यांचाही विचार केला जातो.