Health पुणे : पावसाळा आला की सर्वप्रथम आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. (Health) या दिवसात जितके घरातील अन्न खाल तितके तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरेल. (Health) आहारामध्ये पोषणयुक्त पदार्थांचा समावेश असू द्या. (Health)
जंकफूड खाणे टाळा
तेलकट, मैद्यापासून बनवलेले पदार्थ, पॅटिस यासारखे पदार्थ आहारातून दूर ठेवा. शरीराला आवश्यक असणाऱ्या पदार्थांचे जसे की, कडधान्य, पोळी, फळे, भाज्या सेवन करा, जेणेकरून तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकेल.
जीवनसत्वयुक्त पदार्थ खावेत
संत्री आणि पेरू यांची गणना शरीराला भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व मिळवून देणाऱ्या फळांमध्ये केली जाते. त्यांचे सेवन केल्यास तुम्हाला औषधातून ‘क’ जीवनसत्त्व घेण्याची गरज भासणार नाही. पण पेरू कमी प्रमाणात खावा. हे करत असताना शीतपेय आणि आईस्क्रीम खाणे टाळावे.
नियमित व्यायाम करा अन् फिट राहा
फिट राहण्यासाठी दररोज जिमला जावेच, असा काही नियम नाही. घरच्याघरी देखील तुम्ही योगा किंवा व्यायाम करू शकता. योगा केल्यानंतर 35 ते 45 मिनिटे व्यायाम केल्यास तुमच्या पोटाचा वाढलेला घेर कमी करण्यास मदत होईल. शिवाय तुमची शरीरयष्टीही उत्तम राहील.