पुणे, ता.११ : मेडिटेशन म्हणजेच ध्यान. हे ध्यान केल्याने बरेचसे फायदे होतात. या ध्यानामुळे मनाला शांती मिळते. त्यामुळे तुम्ही देखील ध्यान करायचा विचार करत असाल तर ते करा, त्याने मेंदूत सकारात्मक परिणाम होतो.
खरोखरच मेंदूमध्ये सकारात्मक परिणाम होतो का हे पाहण्यासाठी एक प्रयोग देखील करण्यात आला. त्यामधून आपल्यामध्ये ध्यानाने चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले. आयुष्यातील काही गोष्टी बदलून मेंदूचे आरोग्य सुधारता येऊ शकतो, असा निष्कर्ष काढण्यात आला. एका महिलेने सांगितले की, त्यासाठी त्यांनी स्वतःचा मेंदू स्कॅन करून घेतला. त्याची ‘फंक्शनल मॅग्नेटिक रिझोनान्स’ कार्यात्मक चुंबकीय चाचणी करण्यात आली. ही चाचणी आणि पुढील सहा आठवड्यांच्या प्रयोगानंतरच्या चाचण्यांची एकमेकांशी तुलना करायची होती. यावरून मेंदूत काय बदल झाले हे समजून घेतले. त्यामध्ये मेंदूत सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसले.
योगाचार्य सांगतात की, ध्यान आपल्यातील लपलेल्या शक्तींना कसे ओळखावे आणि कसे समजून घ्यावे हे सांगते. जेव्हा आपण ध्यान तंत्राचा सराव करतो तेव्हा आपण शरीर आणि मनाचे त्रास अधिक चांगल्याप्रकारे समजू शकतो. ध्यानात आपल्याला वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागते.
वैज्ञानिक संशोधनानेही सिद्ध झाले आहे की, ध्यानामुळे शरीरातील विविध हार्मोन्स नियंत्रित राहण्यास मदत होते. हे आधुनिक विज्ञान मानते की तुमची मानसिक स्थिती अनेक प्रकारच्या शारीरिक वेदनांचे कारण आहे. ध्यानामुळे यात सुधारणा होते. त्यामुळे वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. त्यानंतर आपण स्वतःला त्यातून वेगळे करण्याचे सकारात्मक मार्ग शोधू शकतो.