health news : मुंबई : पुदिना म्हटलं की आपल्याला लगेच आठवतात त्याची हिरवीगार छोटी पानं. याच पुदिन्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. पुदिन्यामधील पोषक घटक मेंदूची आकलन शक्तीही वाढवण्यास मदत करतात. यामुळे आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींबाबत आपल्यामध्ये शारीरिक तसंच मानसिकरित्या सतर्कता वाढते. यासह इतर अनेक फायदे आहेत. तेच आज आपण जाणून घेणार आहोत…
स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी तुमचे यकृत देखील सक्रिय असणे आवश्यक आहे. यासाठी नियमित पुदिन्याचे सेवन करावे. पुदिन्याची ४ ते ५ पाने तुम्ही चावून देखील खाऊ शकता. पुदिन्यातील औषधी गुणधर्म आपली स्मरणशक्ती वाढवण्याचे कार्य करतात. नियमित पुदिन्याचे सेवन करणारी लोक इतरांच्या तुलनेत अधिक सक्रिय असतात. पुदिन्यातील औषधी गुणधर्म दम्याच्या रुग्णांसाठी अतिशय लाभदायक असल्याचे म्हटले जाते. धूळ, माती, अन्य गोष्टींपासून अॅलर्जी असणाऱ्यांनी पुदिन्याचा अर्क किंवा स्वयंपाकामध्ये पुदिन्याचा समावेश केल्यास त्यांना भरपूर फायदे मिळतील.
पुदिन्याची चटणी, पुदिनायुक्त ताक, कोंशिबिरीमध्ये पुदिना मिक्स करून त्याचे सेवन करा. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत मिळेल. शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहील. फिट राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी हल्ली प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करत असतात. पण तरीही काही जणांचे वजन नियंत्रणात राहत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये पुदिन्याच्या पानांचा समावेश करू शकता.
पिंपल्स, ब्लॅकहेड्सही करते दूर
पुदिन्यातील औषधी गुणधर्मामुळे सौंदर्य खुलण्यास मदत मिळते. पिंपल्स, ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्समुळे तुम्ही त्रस्त आहात तर पुदिन्याचा पानांचा लेप तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. असे केल्याने नक्कीच फायदा होऊ शकणार आहे. याशिवाय, इतर अनेक फायदेही होतील.