Health News : दैनंदिन जीवनात रोज काहीना काहीतरी शिकायला, अनुभवायला मिळतं. काही चांगलं तर काही वाईट. जर काही वाईट झालं तर चिंता, काळजी आपोआपच सुरु होते. पण हे करणं तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक असतं. त्यामुळेच ताणतणावापासून दूर राहण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जात आहे.
काही लोकांचा विश्वास आहे की, तणाव कमी करण्यासाठी आपण घरातच उपाय करू शकतो. तर काहींना तसे वाटत नाही. पण अशा काही पद्धती आहेत ज्याचा अवलंब केल्याने आपल्याला तणावापासून दूर राहता येऊ शकतं. याची माहिती आज आपण घेणार आहोत…
नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा..
तुम्ही ज्या कामात कुशल आहात त्याच्या मदतीने तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे लिहिण्याची कला असेल तर तुमच्या भावना लिहा किंवा चित्रकला करा.
तणाव टाळण्यासाठी बदला दिनचर्या..
तणाव टाळण्यासाठी आपली दिनचर्या बदला. चांगले आणि ताजे अन्न खा आणि व्यायामाची सवय लावा. घरी फिरायला सुरुवात करा. यासोबतच ताजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.
ध्यानात वेळ घालवा..
जर तुम्हाला तणावावर मात करायची असेल तर ध्यान करा. दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी घ्या आणि ध्यान करा. यासाठी सर्वकाही विसरून जा. ध्यानासाठी ऑनलाईन व्हिडिओंची मदत देखील घेता येऊ शकते.
अनवाणी चाला..
तज्ज्ञांच्या मते, तणाव हा घरबसल्या कमी करता येऊ शकतो. पण त्यासाठी स्वत:ला वेळ देणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही काही वेळ अनवाणी चाला आणि अत्तर किंवा फुलांचा सुगंध घ्या, असे केल्याने मनाला एक वेगळाच अनुभव येईल. त्याने मनाला उल्हास वाटेल.