(Health News ) पुणे : लसूण हा अनेक आजारांवर गुणकारी असला तरी गरजेपेक्षा कच्ची लसूण खाणे किंवा लसणाचे अधिक प्रमाणामध्ये सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. सामान्य कोणतीही व्याधी नसलेल्या व्यक्तीने दिवसातून ४ ग्रॅम म्हणजेच लसणाच्या दोन कळ्या खाणे फायदेशीर ठरते. जाणून घ्या अधिक प्रमाणात लसूण खाल्यामुळे होणारे नुकसान –
अधिक प्रमाणामध्ये कच्ची लसूण खाल्यावर होतात नुकसान…!
अधिक प्रमाणामध्ये कच्ची लसूण खाल्यामुळे लो ब्ड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. चक्कर येऊ शकते.
उपाशीपोटी लसणाचे सेवन केल्याने पोटामध्ये जळजळ व्हायला लागते. तसेच मळमळ होऊन उलट्या होण्याची शक्यता असते.
उपाशीपोटी लसूण खाल्यामुळे अतिसार होण्याची शक्यता असते.
ठराविक प्रमाणापेक्षा अधिक लसूण खाल्ल्यास छातीत वेदना होऊ शकतात. लसणात अम्लीय संयुगे असतात, त्यामुळे याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास छातीत तीव्र वेदना होऊ शकतात.
कच्ची लसूण खाल्यामुळे लिव्हरला त्रास होऊ शकतो. कच्च्या लसणामध्ये अँटी-ऑक्सिडेंट क्षमता जास्त असते. परिणामी लसणाच्या सेवनामुळे लिव्हर आणि पचन संस्थेवर परिणाम होऊ शकतो.
ज्यांना कमी रक्तदाब आहे त्यानी लसणाचे सेवन टाळले पाहिजे. कारणे याने रक्तदाब कमी होऊ शकतो, ज्यामुळे अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे कमी रक्तदाब असलेल्यांनी लसणाचे सेवन करताना सावध राहावे.
Health News : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आमचूर पावडर उपयोगी!
Pune Crime News : घरफोडी ! लोहगावमधील बंद बंगला फोडला ; सव्वा लाखांचा ऐवज लंपास