Health News : पुणे : भारतातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. मान्सूनच्या या आगमनाने उष्णतेपासून दिलासा मिळतोच, पण या ऋतूत विशेष काळजी घेण्याची गरज असते. नाहीतर अनेक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात घर स्वच्छ ठेवण्याचा आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ नेहमीच देतात. (Health News)
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, सर्दी, फ्लू असे अनेक आजार होण्याची शक्यता आहे. या ऋतूमध्ये आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा बाळगू नये. पावसाळ्यात जास्तीत जास्त संसर्ग बाहेरील अन्न किंवा समोसे, पकोडे, चाट इत्यादी तेलकट पदार्थांमुळे होतो. (Health News)
जाणून घ्या पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी काय खाऊ नये..
१) हिरव्या भाज्यांचे प्रमाण कमी असावं..
कोबी, पालेभाज्या, पालक या हिरव्या भाज्या पावसाळ्यात खाऊ नयेत. तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि बुरशीच्या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. पालेभाज्यांमध्ये किडे वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्यात हे खाल्ल्याने पोट बिघडते, त्यामुळे पावसात अशा भाज्यांपासून दूर राहा.
२) तळलेले, मसालेदार पदार्थ टाळावे..
पावसाळ्यात तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळावे. अशा प्रकारच्या अन्नामुळे शरीरातील चरबी आणि पित्त वाढते, जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. म्हणूनच पकोडे, समोसे किंवा तळलेले पदार्थही टाळावेत जे अतिसार आणि पचन बिघडवतात.
३) दह्यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा वापर टाळावा..
पावसाळ्यात दह्यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा वापर करू नये. कारण दहीमध्ये बॅक्टेरिया देखील असतात, जे या हंगामात आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत.
४) सी-फूड खाणं टाळावं..
पावसाळ्यात मासे किंवा कोळंबीसारखे सी-फूड खाणे टाळावे. कारण या ऋतूत समुद्रातील प्राण्यांच्या प्रजननाचा काळ असतो. यामुळेच या ऋतूत मासे खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो.
५) अधिकचा मांसाहार टाळावा..
पावसाळ्यात आपली पचनसंस्था खूप कमकुवत होते, त्यामुळे जड अन्न खाणे टाळावे. अशा परिस्थितीत या ऋतूत मांसाहार टाळा. (Health News)