Health News : पुणे : निरोगी जीवनशैली आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय शोधत असतात. कुणी व्यायाम करत, फॅट कटर ड्रींग पितं, तेलकट टाळतात, मात्र, यात कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. कढीपत्त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत होते. तसेच पाचक प्रणाली सुधारते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
कढीपत्ता खाल्ल्यामुळे चयापचयाच्या क्षमतेत वाढ होते. कढीपत्त्यात असलेल्या कार्बाझोल अल्कलॉइड्समध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. वजन कमी करण्याबरोबरच कढीपत्त्याची पानं पचन सुधारणे, हृदयविकाराचा धोका कमी करणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास फायदेशीर मानली जातात.
आरोग्यासाठी आवश्यक फायदे मिळविण्यासाठी आहारात विविध प्रकारे वापर करू शकतो. पाहूयात…
१) रोज सकाळी रिकाम्या पोटी काही ताजी कढीपत्त्याची पानं खा, यामुळे शरीरास फायदेशीर पोषक घटक वाढतात आणि आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते.
२) कढीपत्त्यापासून सुगंधी चहा बनवण्यासाठी तुम्ही मूठभर कढीपत्ता पाण्यात उकळवा. यानंतर पाणी गाळून घ्या. आता त्यात लिंबाचा रस आणि थोडे मध घाला. वजन कमी करण्यासाठी हा चहा दररोज झोपेच्या वेळी पिऊ शकता. विशेषत: लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी हा चहा खूप फायदेशीर ठरू शकतो.
३) स्वयंपाक करताना वेगवेगळ्या पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर करा. तुम्ही करी, सूप आणि फोडणीचा भात अशा विविध पदार्थ्यांची चव वाढवण्यासाठी कढीपत्ता वापरू शकता.
जाणकारा सांगतात, कढीपत्त्याच्या पानांमध्ये फॅट बर्न करणारे गुणधर्म असतात. तसेच जिरे आणि हळदीही शरीरास अतिशय गुणकारी घटक असतात. हळदीत कर्क्यूमिन असते, जे शरीरातील अतिरिक्त चरबी वाढवण्याचे प्रमाण रोकतात. तर जिरे शारीरिक प्रक्रियांचा वेग वाढवून कॅलरी पटकन बर्न करण्यास मदत करते.
फॅट कटर चहा बनवण्याची कृती
१) १ कप पाणी उकळा, त्यात १ टीस्पून जिरे आणि १०-१२ कढीपत्ता टाकून ती ३-४ मिनिटे उकळवा. यानंतर १/२ टीस्पून हळद घालून ढवळावे. नंतर पिण्यायोग्य थंड झाल्यास प्यावे.
कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांसारख्या महत्त्वपूर्ण खनिजांसह जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि ई समृद्ध आहे. या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात, असंही डॉ. हंसाजी यांनी स्पष्ट केले.