Health News : अशक्तपणा जाणवला की लगेच लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. लिंबू पाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असे वेगवेगळे इलेक्ट्रॉलाईट्स असतात. जे हृदयाचे आरोग्य आणि मांसपेशींना हेल्दी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे आहारात लिंबू पाण्याचा समावेश करून घेणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदतशीर..
रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने त्वचा सुधारते. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. चमकदार त्वचेसाठी तुम्ही दररोज लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. लिंबू पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत करते. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.
वजन कमी करण्यास फायदेशीर..
रिकाम्या पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्याने चयापचय गतिमान होते. त्यामुळे पोटाची चरबी कमी होऊन वजनही कमी होण्यास मदत होते. अनेकदा सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे पचनाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता आणि सूज इत्यादीपासून आराम देते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवतो..
‘व्हिटॅमिन सी’ फ्लू आणि सर्दीपासून संरक्षण करण्यास मदत करते. हे अनेक प्रकारच्या व्हायरस आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी काम करते. लिंबू एस्कॉर्बिक ऍसिडचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे नैसर्गिक पद्धतीने प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.