Health News पुणे : ब्राऊन शुगर नैसर्गिक रंग आणि सुगंधाने युक्त असते. ब्राऊन शुगर उसाच्या रसातून मोलॅसिस काढून तयार केली जाते. पांढरी साखर त्या रंगात आणण्यासाठी अनेक रसायने वापरली जातात. त्यामुळे पांढऱ्या साखरेपेक्षा ब्राऊन शुगर नक्कीच फायदेशीर आहे. जाणून घ्या ब्राऊन शुगर सेवन करण्याचे फायदे –
स्त्रीयांच्या समस्यांवर गुणकारी…!
ब्राऊन शुगरमध्ये पोटॅशियम असल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते.
गर्भवती महिलांची ओटीपोट आणि पाठ दुखी यामुळे कमी होण्यास मदत होते.
त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर
ब्राऊन शुगरमधील व्हिटॅमिन बी 6, नियासिन आणि पॅन्टोथेनिक ऍसिडसारखे घटक त्वचा निरोगी ठेवतात.
वजन नियंत्रणात राहते
ब्राऊन शुगरमध्ये कॅलरीज कमी असते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
दम्याची समस्या
ब्राऊन शुगरमधील अँटी-एलर्जिक गुणधर्म दम्याची लक्षणे कमी करतात.
बद्धकोष्ठता कमी करण्यास, त्वचेचे हायड्रेशन वाढविण्यात मदतबद्धकोष्ठता कमी करण्यास आणि त्वचेचे हायड्रेशन वाढविण्यात मदत करू शकते. पचन आणि गॅसच्या समस्यांवर ब्राऊन शुगर गुणकारी आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही आले आणि एक चमचा ब्राऊन शुगर घालून कोमट पाणी पिऊ शकता.