Health News : शरीरासाठी पालेभाज्यांसह अनेक प्रथिनांची गरज असते. आहारात नियमित पालेभाज्या असल्यास त्याचा चांगला फायदा होण्यास मदतीचे ठरते. त्यापैकी बीट आहे. बीट हे शरीरासाठी चांगलेच फायदेशीर ठरते. रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांसाठी तर ते एकप्रकारे वरदानच असल्याचे सिद्ध झाले आहे.
बीटमध्ये न्यूट्रिशनचे प्रमाण भरभरून असते. त्यामुळे बीट सॅलेडमध्ये खाणे आणि त्याचा ज्यूस पिणे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. एक कप बीटाच्या ज्यूसमध्ये 43 कॅलरीज असतात. यामध्ये 87 टक्के पाणी 8 टक्के कार्बोहायड्रेट्स आणि 3 टक्के फायबर असते. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे भरपूर प्रमाण असते.
बीट हे भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. रोज याचे सेवन केल्याने या दोन्हींचे आवश्यक प्रमाण तुमच्या शरीरामध्ये संतुलित राहते. बीटमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, व्हिटॅमिन बी 9 आणि लोह चांगल्या प्रमाणात आढळते. ज्यामुळे आपल्या शरीराला अनेकप्रकारे फायदा होतो. बीटाला व्हिटॅमिन्सचा प्रमुख स्त्रोत म्हणून ओळखले जाते. बीट हे एक अॅंटीऑक्सिडंटच्या स्वरुपातही काम करते. बीटमध्ये पोटॅशिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते.
कोणी खाऊ नये बीट?
बीटचे फायद्यासोबतच काही नुकसानही आहेत. लो ब्लडप्रेशर असणाऱ्या लोकांनी बीटाचे सेवन करु नये, त्यांच्यासाठी बीट खाणे हे धोकादायक ठरु शकते. नियमितपणे बीटाचे सेवन केल्याने बेटुरिया होऊ शकतो. रोज बीटचा ज्यूस प्यायल्याने किडनीस्टोनचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते.